Tuesday, October 24, 2017

गाव तस शहाण्यांचं

🚫गाव तस शहाण्यांचं🚫                                                            
            खरतर, कर्जमाफी हि कर्जबाजारी शेतकर्‍यांला संकटातून बाहेर काढण्यासाठी आहे. शेतकर्‍यांच उत्पन्न/कमाई
वाढीसाठी खूप घटक महत्वाचे आहेत, जसे की जलसिंचन, बाजारभाव, तंत्रज्ञानाचा अभाव, रोगराई  , निसर्गाची साथ. प्रत्येक वेळी सरकारवर खापर फोडणारे, सरकारच्या नावे बोटे मोडणारे, उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे पाहून अश्रू ढाळनारे आपण, सरकारी योजनेत मंजूर झालेले 2-3 बंधारे /शेततळी वा त्यांचा निधी परत गेला तेंव्हा झोपेचे सोंग घेतल होत का? नेत्यांना सण-सभारंभ, यात्रा आदी कार्यक्रमाचे निमंत्रण देणारे आपण, कधी रस्त्याची दुरावस्था, म्हैसाळ योजनेच काम पूर्ण करण्याची मागणी/आंदोलन केल्याच आठवत नाही. अलीकडेच या योजनेच्या पंप हाऊस चे टेंडर निघाल आहे. याचा फायदा आपल्या पंचक्रोशीला होनार आहे. त्यासाठी follow up घेऊन लवकर वर्क आॅर्डर निघावी अस पाठपुरावा केल्याच ऐकण्यात आल नाही.   खरी शोकांतिका हि आहे कि, कित्येक वर्षे ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करतो. परंतु क्षमता असताना सुद्धा गावातील एकदाही जि.प सदस्य अथवा पंचायत समिती सदस्य निवडून देऊ शकत नाही. अजून किती वर्षे पाहुणे आणि नाती सांभाळणार आहोत?    
        गावाच्या सुपुत्राने (कृषी पदवीधारक) व्यवसाय करण्यास हरकत नाही. परंतु सामाजिक बांधिलकी समजून एखाद शेती मार्गदर्शन शिबीर आयोजित करता येईल का??  त्याचा गावातील/पंचक्रोशीतील लोकांना फायदा होईल. परंतु अस न होता अलिकडे येउ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत. 4-5 कागदपत्रे, तलाठी कार्यालय ते सोसायटी/बँक पर्यंत ने-आण करणाऱ्या, गावात मोटरसायकलवर बसून फुशारक्या मारणारे, स्वयंघोषित युवानेते /आधुनिक शेतकरी तरुणांची संख्या कमी नाही. पोटभर जेवन करुन, चिंचेच्या कट्ट्यावर बसून ढेरीवरुन हात फिरवत दुसर्‍यांची उणीदुणी काढनाऱ्यांची संख्याही कमी नाही. नवी पिढी तरी झाल गेल विसरून हायस्कूलच्या राजकारणातून बाहेर पडेल काय? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल.
                           
 -संतोष फडतरे
 

कोणी सरपंच देत का सरपंच?

                                                                                                                 गाव म्हणल कि राजकारण आलं...