Monday, June 11, 2018

पुतळ्याच्या निमित्ताने

💫 पुतळ्याच्या निमित्ताने ✨                                      
            मित्रांनो, थोर महापुरुषांचे पुतळे व  देवदेवतांची मंदिरे उभारण्यास विरोध नाही. स्मारके, पुतळे हि नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतात. आपल्या महापुरुषांना पुतळ्यापुरतं मर्यादित न ठेवता त्यांचे विचार व साहित्य लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुतळे उभे करताना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून याचा विचार केला पाहिजे. आपल्या गावातील काही अतिउत्साही तरुण मंडळींनी अशीच  पुतळे व मंदिर उभी करण्याचे योजिले आहे असे ऐकण्यात आले. लाखो रुपये खर्चून पुतळा उभा करून यांना काय साध्य करायचे आहे ते देव जाणे. एकतर गावच्या मध्यभागी असलेली तोकडी जागा त्यातच भर म्हणून नव्याने उभी केलेली झेंडे. ना कोणत्या सांस्कृतिक कार्यक्रमाला लोकांना बसता येत ना स्वतंत्रदिन, प्रज्ञासताक दिनी विद्यार्थ्यांना रांगेत उभं राहता येत. या अतिउत्साही तरुणांना पुतळा-झेंडे उभा करण्यामागचा हेतू विचारले असता ताथुर-माथूर उत्तरं देवून निघून जातात. पण हे सगळे भावनेच्या भरात निर्णय घेत असतात, यांना गावातील सुज्ञ नागरिक आणि उच्च शिक्षित तरुण प्रोत्साहन देतात हेही या मागच कटु सत्य. 
            या महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी निमित्ताने डिजेवर नाचून स्वतःच मनोरंजन करुन घेणाऱ्यांना संबंधित महापुरुषांविशयी किती माहिती आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम अभियान, तंटामुक्त गाव अभियान असो किंवा अलिकडचं पाणी फाऊंडेशनचे वाँटर कप, यामध्ये गावच्या सहभागासाठी ह्या मंडळींनी प्रयत्न केल्याचे ऐकण्यात नाही. पण याला अपवाद होती ती 10-12 वर्षांपूर्वीची गावातील तरुण पिढी. अन्याय निवारण आक्रमक समिती स्थापन करून दारूबंदी सारख्या विषयाला हात घातला आणि समाज प्रबोधन केल हि उल्लेखनीय बाब. त्यावेळी उभा केलेला संघटनेचा फलक  आजही साक्ष आहे. परंतु नवीन पिढीला सामावून घेवुन काम पुढे चालू ठेवण्यात हि समिती अपयशी ठरली.


                                         
 - संतोष फडतरे

No comments:

Post a Comment

कोणी सरपंच देत का सरपंच?

                                                                                                                 गाव म्हणल कि राजकारण आलं...